अमळनेरात गळफास घेत महिलेची आत्महत्त्या

नोव्हेंबर 13, 2021 1:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर शहरातील समर्थनगरात ४७ वर्षीय विवाहितेने घरातील पंख्याला ओढणी बांधून, गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

भागवत कोळी व त्यांचा मुलगा शुभम हा १० रोजी रात्री ११.३० वाजता घराचा दरवाजा वाजवत होता. त्यामुळे शेजारील रहिवासी शुभम संदीप पाटील याने दरवाज्याला लाथ मारली. यावेळी नलिनी कोळी यांनी घराच्या बेडरूममध्ये ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now