भुसावळच्या प्रांत कार्यालयातील अव्वल महिला कारकून जाळ्यात

ऑक्टोबर 5, 2021 5:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । प्लॉट एन.ए. करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्वीकारताना भुसावळ प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात अडकली. नंदूरबार लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रतिभार मच्छिंद्र लोहार (वय-४०) असे १० हजाराचे लाच घेणाऱ्या अव्वल कारकूनचे नाव आहे.

crime

याबाबत असे की, भुसावळ शहरातील एका तक्रारदाराने प्लॉट एन.ए. करण्यासाठी भुसावळ प्रांत कार्यालयात त्यांनी सादर केले होते. संशयित आरोपी अव्वल कारकून प्रतिभा लोहार यांनी कामाच्या मोबदल्यात १० हजार रूपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी थेट नंदूरबार लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीनुसार १७ सप्टेंबर २०२१ रोजी सापळा रचला असतांना लोहार यांना संशय आला. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारली नाही. परंतू लाच मागितल्याचे सिध्द झाले होते. त्यानुनसार त्यांना आज मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी नंदूरबार पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या निरीक्षक माधवी वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now