पंतप्रधान मोदी जळगावच्या दौऱ्यावर येणार?

जानेवारी 20, 2024 1:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२४ । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आचारसंहितेपूर्वी राज्यात पाच दौरे करणार असून पहिल्या टप्प्यात शहरी दौरा होणार असून त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रातील दौरे होणार आहेत. त्यानुसार २८ जानेवारी किंवा ५ फेब्रुवारी रोजी जळगावच्या दौऱ्यावर येणार असल्याचे माहिती मिळत आहे. मात्र, या दौऱ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अद्यापही कुठलीही माहिती नाही.

pm modi jpg webp

पुढील फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात पाच दौरे करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई, नाशिकच्या माध्यमातून पहिला दौरा तर २८ जानेवारी किंवा ५ फेब्रुवारी रोजी मोदी जळगावात येतील अशी माहिती स्थानिक पक्षीय सूत्रांनी दिली आहे.

त्यानुसार पंतप्रधान मोदी यांची जळगावात सभा होणार आहे. सभास्थळ निश्चित नसले तरी जिल्हा प्रशासनाने विमानतळ परिसर, शिरसोली रोड, नशिराबाद परिसरात ही सभा घेण्याची शक्यता वर्तविली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now