जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । आयपीएलच्या १५व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार बदलण्याची वेळ आली. रविंद्र जडेजानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे सोपवलं. रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा १३ धावांनी पराभव करत विजय संपादन केला. माही पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद सगळ्यांनाच झाला. स्टेडियममध्ये देखील माहीला चिअर्स करताना चाहत्यांचा जोश वाढला. मात्र, धोनीने निवृत्ती बाबत मोठं वक्तव्य केल्याने त्यांचे चाहते नाराज झाले आहे.
वाचा नेमकं काय म्हणाला धोनी
कॅप्टन कूल धोनी फक्त हाच हंगाम कर्णधारपद सांभाळणार की पुढच्या वर्षीही तोच असणार. या सगळ्या प्रश्नांवर महेंद्रसिंह धोनीनं याचं उत्तर दिलं आहे. तुम्ही मला यलो जर्सीमध्येच खेळताना पाहाल. पण ती पुढे राहिल की नाही याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. धोनीच्या या व्यक्तव्यानंतर अनेक चर्चा होत आहेत. धोनीचा हा शेवटचा हंगाम असणार का? धोनी पुढे नेतृत्व करणार नाही का? अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.
महेंद्रसिंग धोनीच्या या विधानावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. 40 वर्षांच्या धोनीसाठी हा शेवटचा हंगाम असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळेच त्याने कर्णधारपदही सोडले होते, पण टीमची स्थिती पाहता पुन्हा एकदा कर्णधारपद धोनीकडे आलं.रविंद्र जडेजानं कर्णधारपद सोडून खेळवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नईनं 9 पैकी 3 सामने जिंकले आहेत.