जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । पावसाळ्यात मानवी वस्तीत सर्प मोठ्या प्रमाणात आढळून येतात, त्याचबरोबर सर्प मानव संघर्ष हा प्रामुख्याने ग्रामीण भागात अधिक दिसून येतो, शेतातील कामे करत असताना सर्पदंशाच्या घटना घडतात. या घटना टाळण्या साठी तसेच सर्प अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे वर्षभर शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबविण्यात येते. यंदाही 2 ऑगस्ट पासून नागपंचमी च्या धर्तीवर विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आले होते. जळगांव , नासिक, नंदुरबार या तीन जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अभियानात सर्वसामान्य नागरिक, नगरपालिका प्रशासन, ग्रामपंचायत, शेतीशिवार, शाळा, महाविद्यालयात ओळख सर्पांची आणि सर्पदंश कसे टाळावे , सर्प आपल्या घरात कसे येणार नाहीत या बद्दल काय काळजी घ्यावी, सर्पदंश झाल्यावर काय प्रथमोपचार केले पाहिजे यावर सर्पांची सर्वंकष माहिती असलेल्या पोस्टर आणि पुस्तका द्वारे जनजागृती करण्यात आली’

सर्पविद्यान सप्ताहाची सुरवात धरणगाव येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करून करण्यात आली होती. या प्रसंगी संस्थेचे सर्पमित्र योगेश गालफाडे, जगदीश बैरागी, कृष्णा दुर्गे, भरत शिरसाठ, राजेंद्र कुंभार, कैलाश बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. नासिक निफाड नांदगाव तालुक्यात देखील शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी विद्यार्थ्यांना सुशांत रणशुर , अमोल सोनवणे, मयुर बर्वे, पवन नागपुरे यांनी नासिक जिल्ह्यात मार्गदर्शक म्हणून कार्य केले.

जळगांव जिल्ह्यात चोपडा, जामनेर, भुसावळ, एरंडोल , बोदवड, धरणगाव, नेरी, चिंचोली, पिंप्राळा, पथराड, या ठिकाणी देखील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते
1 ऑगस्ट पासून 8 ऑगस्ट पर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अ.नि.स आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सैयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या यात संस्था अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, सचिव योगेश गालफाडे , जगदीश बैरागी, हेमराज सोनवणे, राजेश सोनवणे, प्रदीप शेळके, मुकेश सोनार, भरत शिरसाठ, यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, सतीश कांबळे, प्रभाकर निकुंभ, सुशांत रणशूर, अमोल सोनवणे, हेमराज सोनवणे, निलेश ढाके, रितेश भोई, तुषार रंध्ये, दिनेश सपकाळे, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, जयेश पाटील, धीरज शेकोकरे, वासुदेव वाढे, निलेश ढाके, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे ,चेतन भावसार, ऋषी राजपूत, कुशल अग्रवाल, भूषण कोळी, संतोष चौधरी, गणेश सपकाळे, दिनेश सपकाळे, रितेश भोई, यांनी परिश्रम घेतले
या ठिकाणी केली जनजागृती
काशिनाथ पलोड इंग्लिश मीडियम,ब गो शानबाग सावखेडा शिवार,ए टी झांबरे विद्यालय,पी एम मुंदडे विद्यालय,पिंप्राळा माध्यमिक विद्यालय,सोमाणी विद्यालय पिंप्राळा, शकुंतला विद्यालय विद्युत कॉलनी, नगर पालिका धरणगाव, महात्मा फुले विद्यालय, बी जे महाजन विद्यालय अनोरे, माध्यमिक विद्यालय पथराड जामनेर, जि प प्राथमिक शाळा गाडेगाव,
जनता हायस्कूल नेरी , पाचोरा. माध्यमिक विद्यालय लोहारा,माध्यमिक विद्यालय म्हासास, जिनियस इंग्लिश मिडीयम स्कुल , भुसावळ,वैद्यकीय महाविद्यालय सर्व वसतिगृह
नासिक जिल्ह्यात देखील 15 ठिकाणी नंदुरबार येथे 4 ठिकाणी जनजागृती करण्यात आली.
“वन्यजीव संरक्षण संस्थे तर्फे शून्य सर्पदंश अभियान स्वखर्चाने राबविण्यात येत आहे गेल्या 4 वर्षात आम्ही शाळा, महाविद्यालयात, गाव खेड्यात विविध माध्यमातून अगदी शेतांच्या बांधावर जाऊन 2 लाख लोकांपर्यंत पोहचुन सर्प आणि सर्पदंश प्रथमोपचार आणि उपचार या बाबत जनजागृती द्वारे मार्गदर्शन केले आहे. हा उपक्रम व्यापक स्तरावर आयोजित करण्याचा मानस असून या साठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. – बाळकृष्ण देवरे, संयोजक शून्य सर्पदंश अभियान
“सर्वाधिक सर्पदंश हे शेतकरी आणि शेतमजुरांना होतात, या साठी आम्ही ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. स्वखर्चाने काम करत असल्याने मर्यादा येतात इच्छा असून देखील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात पोचता येत नाही तरी जास्तीत जास्त गावात भेटी देण्याचा प्रयत्न वर्षभर सुरू राहील, सर्पदंश झाल्यास नागरिकांनी बुवाबाजी कडे न वळता तात्काळ रुग्णालयात दाखल झाले पाहिजे. – जगदीश बैरागी, प्रचारक,शून्य सर्पदंश अभियान.












