⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | मुक्ताई भवानी वन्यजीव अभयारण्य परिसरात वन्यजीवची जनजागृती

मुक्ताई भवानी वन्यजीव अभयारण्य परिसरात वन्यजीवची जनजागृती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२३ । 29 जुलै जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव आणि वनविभाग जळगांव यांच्या सैयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस शालेय विद्यार्थ्यासोबतच गावकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

28 जुलै रोजी उपवसंरक्षक श्री ए प्रवीण यांच्या मार्गदर्शनात जळगाव येथून निघालेल्या मोटार सायकल रॅलीचे नशिराबाद ग्रामस्थांनी उस्फुर्त स्वागत केले. भुसावळ येथील सेंट अलायंस हायस्कूल, महाराणा प्रताप विद्यालय, येथे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता व्याघ्र डोलार खेडा येथील ग्रामस्थांनी रॅली चे स्वागत केले. आणि वाघा संदर्भातील आठवणींना उजाळा दिला 29 रोजी चारठाना येथील भवानी माता मंदिर आवारात वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सचिन ठाकरे यांच्या, वनपाल दिगंबर पाचपांडे, यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली चे उद्घाटन करण्यात आले, वाघ वाचवा जंगल वाचवा, रुबाबदार व्यक्तिमत्व या प्राण्यांचे अस्तित्व टीकवू वाघांचे, अशा घोषणा देत चारठाना, निमखेडी, महाल खेडा, नांदवेल, दोलारखेडा, वायला व परिसरातील गावातून जनजागृती करण्यात आली या जनजागृती दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या, दिशा बहुद्देशीय संस्थेचे विनोद ढगे आणि त्यांच्या पथकाचे पथनाट्य विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रमांचे प्रास्ताविक रवींद्र फालक यांनी केले सूत्र संचालन बाळकृष्ण देवरे यांनी केले आभार प्रदर्शन योगेश गालफाडे यांनी केले, डोलारखेडा येथे रॅली चा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , रवींद्र सोनवणे, राजेश सोनवणे, मुकेश सोनार, जगदीश बैरागी, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, तुषार वाघुळादे, प्रदीप शेळके, वासुदेव वाढे, निलेश ढाके, सप्नील महाजन, सतीश कांबळे, विजय रायपुरे, स्कायलेब डिसुझा, भरत शिरसाठ, चेतन भावसार, स्कायनेट चे उदय पाटील, शिवराज पाटील , संजीव सटाले , वाशिम जिल्ह्यातील कोब्रा एडव्हेंचर, रायबा ट्रेकर्स ग्रुप, ठाणे जिल्ह्यातून होवोहोम चॅरिटेबल ट्रस्ट, गुजरात येथील wcb फाउंडेशन, समर्पण संस्था, वन्यजीव संरक्षण संस्था नासिक, नांदगाव, निफाड, अकोला, गुजरात, वाशिम, मुंबई, पुणे येथून व्याघ्र दुत सहभागी झाले होते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.