अनधिकृत तळमजल्यावरची कारवाई महापौर आणि उपमहापौर का थांबवत आहेत?

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील अनधिकृत तळमजल्यावर कारवाई करण्यासाठी मनपा नगररचना विभाग तयार आहे. मात्र महापौर व उपमहापौर ही कारवाई का थांबत आहेत ? असा प्रश्न नगरसेवक चेतन संकत यांनी विचारला आहे.

जळगाव शहरातील व्यापारी संकलित संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत करण्यात येणाऱ्या व्यवसायावर कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. कित्येक सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी हीच मागणी उचलून धरली आहे. मात्र अद्यापही यांच्यावर कारवाई केली जात नाहीये. अशावेळी नगरसेवक चेतन संकत यांनी एक मोठा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी थेट महापौर व उपमहापौर यांच्यावरच बोट उचलल आहे. याचबरोबर कारवाई न होण्यामागचं गौड बंगाल नक्की काय आहे? हे देखील उघड होणे गरजेचे असल्याचे त्यांनी मत व्यक्त केल आहे.

व्यापारी संकुलातील या पार्किंग च्या ठिकाणी बांधलेल्या दुकानांवर होणाऱ्या कारवाईला पदाधिकाऱ्यांनीच विरोध केला असल्याचा आरोप चेतन संकट यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की शहरातील व्यापारी संकुलाच्या पार्किंग मधील दुकानांवर कारवाई करून त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्याबाबत महापौर, उपमहापौर आम्हाला बैठकीसाठी बोलवत होते. प्रत्येक वेळी बैठकीत हाच विषय करत होते. मात्र नगररचना विभागाने दुकानावर कारवाई करण्याचे आदेश काढल्यावर मात्र ते गप्प झाले आहेत. आता कोणत्याही बैठकीत महापौर किंवा उपमहापौर कारवाईचा विषय काढत नसून त्याविषयी काही बोलत नाहीत. याचा खुलासा त्यांनी करणे गरजेचे आहे. त्यांना या विषयाचा विसर पडला आहे. पर्यायी महापौर उपमहापौर यांनी आपली भूमिका त्वरित स्पष्ट करावी अशी मागणी नगरसेवक चेतन संकत यांनी केली आहे