दिल्लीच्या स्फोटात वापरलेल्या ‘त्या’ कारचा कार मालक कोण? मोठी माहिती समोर

नोव्हेंबर 11, 2025 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२५ । दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई आय२० कारमध्ये स्फोट झाला, ज्यामध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू आला तर २० हून अधिक जण जखमी झाले. या स्फोटामुळे देशाची राजधानी दिल्ली हादरली असून ज्या आय-20 कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारचा मालक कोण आणि कारचा नंबर काय याबाबत तपास सुरू असताना एक मोठी माहिती समोर आलीय

delhi blast

या प्रकरणात वापरण्यात आलेल्या कारबाबत पुलवामामधून मोठा दावा समोर आला आहे. तसेच दिल्ली स्फोटासाठी वापरलेल्या i-20 कारचा चालक नाव मोहम्मद उमर समोर आलं आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ही i-20 कार काश्मीरमधील पुलवामाच्या मोहम्मद उमर या व्यक्तीच्या नावावर होती आणि कारमध्ये अमोनियम नायट्रेटसारखी शक्तिशाली स्फोटके असल्याचे आढळले.

सुरक्षायंत्रणांना या स्फोटाचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मोहम्मद उमर हा फरीदाबादच्या सारंगपूर स्फोट प्रकरणाशीही संबंध असल्याचे समजते. दिल्ली पोलिस आणि एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) या दोन्ही संस्था आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

i-20 कारबाबत माहिती
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटात वापरलेली i-20 कार सुरुवातीला सलमान नावाच्या व्यक्तीने 2014 मध्ये खरेदी केली होती. त्यानंतर त्याने ती ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली. देवेंद्रने ती अंबालातील आणखी एका व्यक्तीला विकली. अखेरीस ही कार जम्मू-काश्मीरमधील तारिक नावाच्या व्यक्तीकडे पोहोचली. या साखळीतून ही कार अखेरीस उमर किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now