अरेरे.. 32 हजारांची लाच घेताना रावेरातील वजनमापे निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

सप्टेंबर 27, 2022 4:28 PM

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । रावेर शहरातील वजनमापे निरीक्षकाला 32 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

crime 2022 06 11T112628.555

सुनील रा.खैरनार (रा.एमआयटी कॉलेजजवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एस.एस.सन्स पेट्रोल पंपावर हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील, निरीक्षक एन.एन.जाधव व सहकार्‍यांनी यशस्वी केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now