जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२५ । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब टाकला. २ एप्रिलच्या रात्रीपासून ट्रम्प यांनी सर्वच देशावर कर लावला आहे. त्यानुसार भारतावर २६% परस्पर टॅरिफ कर लादण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका जगभरात बसणार आहे. यामध्ये चीनवर ३४ टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. युरोपियन युनियनवर २० टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के,दक्षिण कोरिया २५ टक्के, जपान २४ टक्के, तैवान ३२ टक्के, युके १० टक्के कर लावण्यात आला आहे.

टॅरिफ कर म्हणजे समन्यायी कर (आयात कर). भारत त्या वस्तू अमेरिकेकडून आयात करतो त्यावर हा कर लागणार आहे. ट्रम्प यांच्या शुल्काचा भारतावर निश्चितच परिणाम होईल. निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क वाढल्याने निर्यात कमी होऊ शकते.भारतातून अमेरिकेत कपडे, औषधे, टेक्निकल सेवा, रासायनिक उत्पादने निर्यात होतात.निर्यात घटल्याने संबंधित क्षेत्रावर परिणाम होऊ शकते. भारत अमेरिकेकडून तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादने आयात करतो. जर भारताने आयात शुल्क वाढवले तर संबंधित गोष्टींच्या किंमतीत वाढ होऊ शकते.
या गोष्टींवर आयात शुल्क नाही
सोनं, प्लॅटिनम, व्हिटामिन, इन्सुलिन, स्टील आणि कागद या गोष्टींवर आयात शुल्क आकारले गेले नाही. जर आयात शुल्क वाढले तर त्याचा परिणाम इंधन उत्पादनावर होतो. जागतिक बाजारपेठेत तेल उत्पादन कमी होते. परिणामी तेल महाग होऊ शकते. सोन्यावर आयात शुल्क न लागल्याने कदाचित गुंतवणूक वाढू शकते.
टॅरिफ बाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की,भारताबाबत कठीण (निर्णय घेणं) होतं, पंतप्रधान मोदी माझे अगदी चांगले मित्र आहेत, पण मी त्यांना सांगितलं, ‘तुम्ही आमच्याशी नीट वागला(शुल्काबाबत) नाहीत,” असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर “सवलतीचं”26% आयात शुल्क जाहीर करताना म्हटलं.