---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र वाणिज्य

लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र सरकारने महिलांकरीता सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चांगलीच चर्चेत असून या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. जुलै महिन्यापासून ही योजना राज्य सरकारने राबवली आहे. आतापर्यंत पाच हप्त्यांचे ७५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. त्यानंतर आता पुढचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी येणार, याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

ladki bahin yojna

लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले. यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे अॅडव्हान्समध्ये देण्यात आले आहे. १० ऑक्टोबरला हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले. दरम्यान, आता पुढचा हप्ता महिलांच्या अकाउंटला कधी जमा होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

---Advertisement---

आता लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता हा डिसेंबर महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात देण्याचे कारण म्हणजे पुढचा महिनाभर आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता महिलांना पुढील हप्त्यासाठी दीड महिना वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. जर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जाणार आहे. त्याचसोबत योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.त्याचसोबत महिलेच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी करत नसावे, तसेच कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावा. याचसोबत ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---