मार्च आणि एप्रिल महिन्यात देशात विचित्र वातावरण पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळीने पावसाने देशातील अनेक राज्यांना झोडपून काढलं आहे. त्यातच आता भारतीय हवामान खात्याने 8 मे च्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.’ या चक्रीवादळाला ‘मोचा’ असं नाव देण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचे परिणाम देशातील राज्यांवर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
या चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 2023 वर्षातील पहिलं चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. चक्रीवादळ येत्या एक दोन दिवसात पश्चिम बंगालच्या खाडीतधडकेल असा अंदाज आहे.
पूर्वी भारताचा भाग ते म्यानपर्यंत या चक्रीवादळाचे परिणाम पाहायला मिळू शकतात. त्यामुळे या चक्रीवादळाचे अलर्ट देण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशाचे सरकारने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF आणि आपात्कालीन टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर तर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पावसाची शक्यता आहे.