⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

Welfare Scheme : घडीपत्रिकाचे पाचोऱ्यामध्ये वाटप व वाचन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अमृत महोत्सव व महाराष्ट्र दिनानिमित्त पाचोरा येथील विविध शासकीय कार्यालयात ध्वजवंदनानंतर ‘सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जनजागृती’ या कार्यक्रमांतर्गत सामाजिक जिल्हा ते गावपातळीपर्यंत कल्याणकारी योजनांचे घडीपञिका देण्यात येत आहे.

पाचोरा येथील तहसिल कार्यलय, उपविभागीय कार्यालय, पोलिस स्टेशन, नगरपालिका विविध शासकिय विभागात घडी पञिका देण्यात आल्या. तत्पुर्वी पंचायत समिती येथे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उन्नती व्हावी यासाठी समाजकल्याण, बार्टी व महामंडाळा मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी अतुल पाटील, समाजकल्याण तालुका समन्वयक अनिल पगारे, पाचोरा पंचायत समिती कार्यालय अधिक्षक टेकाडे, डी. एस. सुरवाडे, राजेन्द्र धस, सुनिल पाटील, ईश्वर देशमुख, विजय साळवे सह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक योजनांचा जागर कार्यक्रमातंर्गत समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन योजनांची घडीपञिका दिली. सदर समाजकल्याण योजनांचा जागर कार्यक्रम सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.