जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ । आजवर नारायण राणे, छगन भुजबळ आदींसारख्या अनेकांनी शिवसेनेला सोडले. मात्र आम्ही व शिंदे साहेबांनी शिवसेनेला सोडलेले नाही. आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेतच आहोत असं म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक होतांना दिसले. ते तालुक्यातील बांभोरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी जाहीर सभेत बोलत होते.
जल जीवन मिशन अंतर्गत २ कोटी ३८ लक्ष पाणीपुरवठा योजना, बांभोरी बु.- अनोरे रस्त्याचे डांबरीकरण ५९ लक्ष, आमदार निधीतून जवखेडा रस्ता डांबरीकरण २० लक्ष, गावंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण १० लक्ष अश्या एकूण ३ कोटी २९ लक्षच्या चौका – चौकात विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातून मंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांची ढोल – ताशे व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, तालुका संघटक रविंद्र चव्हाण, मार्केटचे सदस्य प्रेमराज पाटील, प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवा सेनेचे भैया महाजन, आबा माळी, दीपक भदाणे, शेतकरी सेनेचे विनायक महाजन, किशोर पाटील, सरपंच कमलबाई भिल, उपसरपंच गोपीचंद सोनवणे, माजी सरपंच सुभाष पाटील, शिवदास पाटील, नरेश पाटील, अंकुश पाटील, विक्रम पाटील, अमृत पाटील, वि.का.सोसाचे चेअरमन दिलीप पाटील, अर्जुन सोनवणे, अंजनी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी आर. जे. पाटील, शाखा अभियंता व्ही. जी. परब, पी. बी. बोदडे, सर्व ग्रा.पं. सदस्य, सोसायटीचे संचालक, डी.ओ. पाटील , निंबा कंखरे, प्रिया इंगळे, पूनम पाटील, कृणाल इंगळे, रेखाताई पाटील, सत्यवान कंखरे, नगरसेवक पप्पू भावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, शुभम चव्हाण, दिपक जाधव यांच्यासह परीसरातील सरपंच व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाखा अभियंता विजय परब यांनी सांगितले की, बांभोरी गावांत 440 हेक्टर म्हणजे 1 हजार एकर शेती ओलीताखाली आणण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी 31 कोटींचे बंदिस्त लाईनच्या योजनेस मंजुरी मिळून दिली असून लवकरच कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले तर सूत्रसंचालन युवासेनेचे भैय्या मराठे सर यांनी केले. आभार मार्केटचे संचालक प्रेमराजबापू पाटील यांनी मांनले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्रेमराज पाटील, सुभाष पाटील, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केले होते