⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

कापसाला भाव मिळो यासाठी विठ्ठलाला घातले साकडे !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । शेतकऱ्यांच्या कापसाला सरकार ने भाव द्यावा, कापूस फेडरेशन तात्काळ सुरू करावे, स्वतः ला बुद्धी चे मालक समजणाऱ्या फडणवीस – शिंदे यांना विठ्ठल रुक्मिणी बुद्धी देवो यासाठी पाचोरा येथे तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुका काँग्रेस ने विठ्ठल रुक्मिणी यांना साकडे घातले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस जवळपास ८० टक्के आजही घरात पडुन आहे.. सदर चा कापुस घरात पडलेला असल्याने हे सुलतानी संकट समोर असतानां पावसाने पाठ दाखवलीचे अस्मानी संकट उभे ठाकले आहे. यातुन सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी आषाढी एकादशी च्या निमित्ताने पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल रुक्मिणी च्या मंदीरात टाळ मृदगच्या गजरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी सेवा दलाचे तालुका अध्यक्ष धनराज पाटील, एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, रविंद्र पाटील, भगवान पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, प्रवीण राठोड, स्वप्नील पाटील, रवी पाथरवट, संदीप पाटील आदी उपस्थित होते.