⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | राष्ट्रीय | भारतासाठी अतिशय वाईट बातमी! विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित, नेमकं काय घडलं?

भारतासाठी अतिशय वाईट बातमी! विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित, नेमकं काय घडलं?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२४ । पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजेच भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची अंतिम फेरी खेळू शकणार नाही. तिला अंतिम फेरीसाठी अपात्र घोषित करण्यात आले. ऑलिम्पिक समितीचा हा निर्णय केवळ विनेश फोगटसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी अत्यंत निराशाजनक आहे. या निर्णयानंतर विनेशच्या तसेच संपूर्ण देशाच्या सुवर्ण जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. तिने यात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम विनेश फोगाट खेळू शकणार नाहीय. तिला अंतिम फेरीसाठी अपात्र घोषित करण्यात आले.

नेमकं काय घडलं?
विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.