
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल येथील तहसीलदार तथा मामलेदार न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या वादातील प्रकरणात प्रतिवादींच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे. मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2) अंतर्गत दाखल प्रकरण क्रमांक 17/2026 मध्ये वादी यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने अमान्य केला आहे. त्यामुळे प्रतिवादींना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
पिंपळोद खुर्द येथील गट क्रमांक 111 व 112 संदर्भात हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. या प्रकरणात प्रतिवादींच्या वतीने ॲड. गौरव कमलसिंग पाटील आणि ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. प्रकरणातील कायदेशीर तरतुदींचा सखोल अभ्यास, उपलब्ध कागदपत्रांचे विश्लेषण आणि ठोस युक्तिवादाच्या आधारे त्यांनी प्रतिवादींची बाजू सक्षमपणे मांडली.
या युक्तिवादानंतर 6 नोव्हेंबर 2026 रोजी तहसीलदार तथा मामलेदार न्यायालयाने वादींचा अर्ज अमान्य करण्याचा आदेश दिला. या निकालामुळे प्रतिवादींना महत्त्वपूर्ण कायदेशीर यश मिळाले आहे.
किचकट स्वरूपाच्या या प्रकरणात योग्य कायदेशीर मांडणी आणि प्रभावी युक्तिवादाच्या जोरावर मिळवलेल्या यशाबद्दल ॲड. गौरव पाटील आणि ॲड. देवकांत पाटील यांचे परिसरातून कौतुक होत आहे.





