जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची लसीकरण मोहीम घेण्यात आली. ही मोहिम इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीने राबवली.

कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या संसर्गात लसीकरणाचे महत्त्व रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी यांनी समजवून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे लसीकरण रोटरी गोल्ड सिटीने आयोजित केले होते, असे अध्यक्ष उमंग मेहता यांनी सांगितले. यावेळी सचिव डॉ. नीरज अगरवाल, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, प्रकल्प प्रमुख सौरभ पटणी, मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी रोटरी गोल्ड सिटीचे प्रखर मेहता, राकेश सोनी, प्रशांत कोठारी, राहुल कोठारी, किशोर पाटील, संजय खैरनार, कृष्णा महाले, संगीता पाटील, दिनेश सोनवणे, विकास तायडे, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी, रेडक्रॉसचे तेजल धनगर, प्रियांका मोरे, मयूरी चव्हाण यांनी सहकार्य केले. आशा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
हे देखील वाचा :
- पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- मुख्यमंत्री फडणवीसांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
- ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग दणक्यात! शिरसोलीत ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी लुटला आनंद
- मुंबई-पुण्यासह तालुक्यांचा एसटी प्रवास महागला; वाचा जळगाव आगारातील नव्या तिकीट दरांची यादी!







