⁠ 
शनिवार, मे 11, 2024

पत्रकार दिनानिमित्त मुक्ताईनरात लसीकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुका पत्रकार संघटनेतर्फे शहरातील प्रवर्तन चौकात पत्रकार दिनाचे औचित्य साधून १५ ते १८ व त्या वरील सर्वच वयोगटातील नागरीकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी शिबिराचे उद्घाटन वैद्यकिय उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.योगेश राणे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देशमुख, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. जगदिश पाटील, संत मुक्ताई संस्थानचे उध्दव जुनारे महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, शिवसेना गटनेता राजेंद्र हिवराळे, तालुका वैद्यकीय कर्मचारी अर्जुन काळे, व्ही.एस.पाटील, प्रदिप काळे, ज्योती खरे, रितेश गवई, ऍड. राहुल पाटील, गणेश टोंगे, विशाल पाटील, हर्षाली महाजन, निलेश भालेराव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. व हित कापुन कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिक्षक डॉ.योगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद बोदडे, उपाध्यक्ष विनायक वाडेकर, सचिव संदिप जोगी, स्टार पत्रकार मतिन शेख, मोहन मेढे, आतिक खान, प्रमोद सौदाळे, पंकज कपलेअक्षय काठोके, पंकज तायडे, विठ्ठल धनगर, नगरसेवक संतोष मराठे, राजेश चौधयी, राजेश पाटील, एम.के.पाटील, दिपक चौधरी, नितीन कासार, मुकेश महल्ले, सतीश गायकवाड, देवेंद्र काटे, अमोल वैद्य, रवी गोरे,संजय वाडीले, प्रविण भोई, छबिलदास पाटील, संजय माळी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. दरम्यान स्टार पत्रकार म्हणुन दै.लोकमत चे मतिन शेख व विनायक वाडेकर यांची महाराष्ट्र राज्यातील पाच मध्ये निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.

हे देखील वाचा :