जळगाव जिल्हा

अखेर ज्वारी खरेदीला शासनाने दिली परवानगी ; जिल्ह्यातील १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीला शासनाने अखेर परवानगी दिली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश दिले आहेत. बाजारभावापेक्षा जादा भावाने ज्वारी खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव बाजारात मिळत असल्याने यंदा तूर, हरभरा, मका अशा कोणत्याच धान्याची खरेदी किंवा साधी नोंदणी झालेली नाही. ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करीत होते अखेर शासनाने ८ मे रोजी ज्वारी खरेदीचे आदेश दिले आहेत.

शासनाने ज्वारीसाठी ३ हजार १८० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला आहे. बाजारात ज्वारी २००० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे. ८०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मका आणि हरभरा यांना बाजारभावापेक्षा कमी हमीभाव असल्याने वर्षभरात शासकीय खरेदीच झाली नाही. शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील या केंद्रांना ज्वारी खरेदी नोंदणी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, एरंडोल, जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव येथील शेतकरी सहकारी संघांना, तर बोदवड सहकारी पर्चेस अँड सेल्स युनियन, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संस्था, फ्रुटसेल सोसायटी पाळधी, शेंदुर्णी सहकारी जिनिंग व प्रेसिंग, कोरपावली वि.का. सोसायटी, यावल या केंद्रांना जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी ज्वारी खरेदी नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button