⁠ 
सोमवार, जून 17, 2024

जागतिक परिचारीका दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात विविध कार्यक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२४ । 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो, हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या प्रणेत्या फ्लोरेन्स नाइटिंगेलचा जन्मदिवस असून जागतिक स्तरावर साजरा केला जातो, जगभरातील परिचारिकांच्या निःस्वार्थ समर्पण आणि करुणेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या वर्षीची थीम, अवर नर्सेस, अवर फ्युचर: द इकॉनॉमिक पॉवर ऑफ केअर आहे ही असून या निमीत्‍ताने गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सभागृहात लॅम्प लाईटिंग व परिचारीकेचे कार्य प्रामाणिकपणे करण्याची शपथ यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी उपस्थीत राहून कृतज्ञता व्यक्‍त करावी असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

परिचारिका या आरोग्यसेवेचा कणा — विशाखा गणविर प्राचार्य गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिग जळगाव.
परिचारिका या आरोग्यसेवेचा कणा आहेत, रूग्णांच्या आरोग्याची काळजी व आरोग्य सुखकर करण्यासाठी त्या पडद्यामागे राहुन काम करतात. ज्या क्षणापासून काही कारणास्तव रुग्णालयात उपचारार्थ जात असतो, परिचारिका त्याच क्षणापासून सतत सोबत असतात, एक आश्वासक स्मित ठेवून दिलासा देतात. परिचारिका दिनानिमित्त त्यांची करुणा, सहानुभूती आणि उपचारासाठी त्यांचे समर्पणाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. परिचाराकांच्या अथक परिश्रमाचा आणि निस्वार्थ सेवेचा सन्मान करूया, त्यांच्या अटळ समर्पणाबद्दल, दयाळूपणाबद्दल आणि करुणेबद्दल आभार व्यक्त करूयात. परिचारिका आरोग्यसेवेचा कणा आहेत ज्यावर संपूर्ण आरोग्य सेवा तटस्थ पणे ऊभी आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२४ च्या शुभेच्छा!