सोमवार, डिसेंबर 11, 2023

पोलीसांची मोठी कारवाई : तब्बल इतका गुटखा केला जप्त !

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । जळगाव जिल्ह्यात पोलीसांनी मोठी कारवाई केली असुन ५७ हजार रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे.

परिवार कलेक्शन याठीकाणा समोरील पाटीलवाडा येथे बेकायदेशीर सुगंधित पान मसाला व गुटखा याची साठवणूक केली जात होती.य़ा प्रकरणी एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. य़ावेळी ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील परिवार कलेक्शन समोर असलेल्या पाटीलवाडा या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशीरपणे प्रतिबंधित असलेला पान मसाला व गुटखा विकीसाठी साठवणूक केल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुरुवारी १२ जुलै रोजी रात्री ८ वाजता धडक कारवाई करत असताना ५७ हजार ६३८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी विजय चंद्रकांत देवरे रा. पाटीलवाडा, चाळीसगाव याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.