⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून भुसावळमार्गे धावणार ‘या’ उत्सव विशेष गाड्या

प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून भुसावळमार्गे धावणार ‘या’ उत्सव विशेष गाड्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । भुसावळ मार्गे नागपूर, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं दिवाळीसाठी काही उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत लोकमान्य टीळक टर्मिनन्स ते नागपूर या स्थानकांदरम्यान आज २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत द्विसाप्ताहिक सुपरफास्ट गाडी चालविण्यात येणार आहे.

अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी ११ अशा एकूण २२ फेऱ्या होणार असून, ही गाडी अकोला स्थानकावर थांबणार असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. ०१०३३ एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसपासून दर मंगळवार आणि गुरुवारी २०:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०:२५ वाजता नागपूरला पोहोचेल.

०१०३४ नागपूर-एलटीटी द्विसाप्ताहिक सुपरफास्ट २७ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत दर बुधवार आणि शुक्रवारी १३:३० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. पूर्णपणे वातानुकुलीत असलेल्या या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा स्थानकांवर थांबा असणार आहे. एक फर्स्ट एसी, दोन एसी-२ टियर, १५ एसी-३ टियर, पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन, अशी या गाडीची संरचना आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.