जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा २०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेत CRPF, BSF, CISF, ITBP आणि SSB मधील सहाय्यक कमांडंटची पदे भरली जातील. UPSC CAPF Bharti 2026

पदवी पास असलेल्या तरुणांना ही मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. लक्ष्यात असू द्या इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. UPSC CAPF Recruitment 2026

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३४९ रिक्त पदे भरेल.
रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
सीमा सुरक्षा बल (BSF) -108 पदे
केंद्रीय रिजर्व पुलिस बल (CRPF) – 106पदे
भारत-तिब्बत सीमा पुलिस (ITBP) – 12 पदे
सशस्त्र सीमा बल (SSB) – 53 पदे
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) – 70 पदे
कोण अर्ज करू शकते??
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे अनिवार्य आहे.
उमेदवारांचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे (नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी सूट लागू आहे).
उमेदवार भारतीय नागरिक असले पाहिजेत.
उमेदवारांनी CAPF पदांसाठी UPSC ने निश्चित केलेल्या शारीरिक आणि वैद्यकीय मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
परीक्षा फी : General/OBC: ₹२००/- [SC/ST/महिला: फी नाही]
अर्ज कसा करावा?
प्रथम, अधिकृत वेबसाइट, upsconline.nic.in ला भेट द्या.
नोंदणी करण्यासाठी आणि युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर (यूआरएन) मिळविण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
नोंदणी केल्यानंतर, लॉग इन करा.
सामान्य अर्ज फॉर्म (सीएएफ) भरा आणि आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील प्रविष्ट करा.
परीक्षा-विशिष्ट मॉड्यूलमध्ये परीक्षा केंद्र निवडा आणि अर्ज शुल्क सबमिट करा.
तुमचा स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी आणि आयडी तपशील अपलोड करा.
सर्व तपशील तपासा आणि फॉर्म सबमिट करा.












