जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । राज्य सरकारकडून सुरु असलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेचे आतापर्यंत ९ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता महिला एप्रिलच्या १० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. यातच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर आलीय.

एप्रिल महिन्याला हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेत गेल्या ३-४ महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे या महिन्यातदेखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात.लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल, अशा चर्चा होत होत्या. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एप्रिलचा हप्ता लांबणार?
लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लांबण्याची देखील शक्यता आहे. आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे २ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता लांबणार आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.