जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । वि.का.सो. चेअरमनपदी मधुकर ओंकार वाघ तर व्हा चेअरमन पदी उस्मान कालेखा मेवाती यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवड करण्यात आलेल्या चा सत्कार माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या बांबरुड येथील वि.का.सोच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार दिलीप वाघ प्रणित असलेल्या सहकार पॅनलला १३ पैकी १३ जागेवर एकतर्फी मोठया फरकाने विजय मिळवला तर भाजप प्रणित पॅनलचा सुफळा साफ केला.
यावेळी माणिक विठ्ठल शिंदे,महादू वना कोकणे,निवृत्ती शामराव सूर्यवंशी,राजेंद्र जयराम जगताप,रविंद्र माणिक गोराडे, अशोक रामदास दरकोंडे, महारु रामा वडरप,छायाबाई रविंद्र पाटील,सुरेखा प्रकाश पाटील सर्व संचालक मंडळाचे तसेच सामनेर, लासगाव येथील नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार माजी आमदार दिलीप वाघ,पीटीसी चेअरमन संजय वाघ, दगाजी वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.