केरळ राज्याच्या नामकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी ; नवीन नाव काय? घ्या जाणून

फेब्रुवारी 24, 2026 6:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारने देशातील एका महत्वाच्या राज्याचे नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळच्या नावबदलाबाबत मंजुरी दिली आहे. आता भविष्यात या राज्याला त्याच्या नव्या नावानेच ओळखावे लागणार आहे.

modi cabinet jpg webp

काही दिवसांपूर्वी केरळमधील राज्य सरकारने केरळच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीला अधिक सुसंगत नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात सादर केला होता. या प्रस्तावाला आज केंद्राने मान्यता दिली आहे.

या प्रस्तावानुसार आता केरळचे नाव केरळम केले जाणार आहे. येत्या एप्रिल, मे महिन्यात केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केरळचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे.

भारतीय संविधानातील 8 व्या अनुसूचिमध्ये केरळ राज्याच्या नावात केरळम असा बदल केला जाणार आहे. दरम्यान, केरळमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना केंद्र सरकारने राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे त्या राज्यात भाजपाला तसेच मित्रपक्षांना काही फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now