⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

चाळीसगावात अज्ञात चोरट्यांनी केली ३१ हजाराची रोकड लंपास; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडच्या जवळ असलेल्या बजाज गॅस एजन्सीचे शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील ३१ हजार ८०० रूपयांची रोकड लांबविल्याची घटना १ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास  उघडकीला आली. याप्रकरणी बजाज एजन्सीचे व्यवस्थापक अशोक किसनचंद छाबडिया यांच्या फिऱ्यावरून येथील शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, शहरातील मालेगाव रोडवर बजाज गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते १ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एजन्सीचे बंद कार्यालय अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून कार्यालयातील कॅबिनमधील ड्राव्हरमध्ये ठेवलेले ३१ हजार ८०० रूपये चोरून नेल्याचे उघडकीला आहे.
याप्रकरणी बजाज एजन्सीचे व्यवस्थापक अशोक किसनचंद छाबडिया (वय-५६) रा. पवार वाडी, चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राहूल सोनवणे करीत आहे.