चाळीसगावात अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री तोडले लॉन्ड्रीचे दुकान

एप्रिल 12, 2022 1:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव शहरातील एका भागात असलेल्या लॉन्ड्रीच्या दुकानाला काही अज्ञात व्यक्तींनी तोडून दिले. हा प्रकार ११ रोजी मध्यरात्री घडला. यामुळे दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले असून त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

dukan

अधिक माहिती अशी की, शहरातील पाटणादेवी रोड वरील धनगर गल्ली समोर राजू परदेशी यांची लॉन्ड्रीचे दुकान आहे. दि.११ रोजी मध्यरात्री राजू परदेशी यांची टपरी काही अज्ञात लोकांनी तोडून टाकली. परदेशी यांची ही टपरी 27 वर्ष जुनी होती. व त्यांनी ती विकत घेतलेली होती. टपरीच्या आजूबाजूला देखील चार-पाच दुकाने आहेत. मात्र, काही हितचिंतकांनी त्यांची टपरी तोडली. यामुळे परिसरातील नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त हिट आहे. राजु परदेशी यांची परिस्थिती साधारण आहे. त्यामुळे त्यांना मानसिक आणि भावनिक आधार देण्याची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now