⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | बातम्या | दुर्दैवी : भीषण अपघातात चिमुकला ठार; नऊ जण गंभीर जखमी

दुर्दैवी : भीषण अपघातात चिमुकला ठार; नऊ जण गंभीर जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२  जळगाव येथून प्रवाशी घेवून जात असलेल्या वाहनाला भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीने जोरदार धडक दिल्याने ११ महिन्यांचा चिमुकला जागीच ठार झाला तर ९ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे प्रवाशी वाहतूक करणारी खाजगी टाटा मेक्सिमा (क्रंमाक – एमएच १५ इएक्स १८३२) ही प्रवाशी घेऊन निघाली. दरम्यान शिरसोली येथे आल्यानंतर दापारो (शिरसोली) येथील रहिवाशी भगवान सोनवणे यांनी पत्नी अनिता भगवान सोनवणे व त्यांचा ११ महिन्याचा चिमुकला गणेश यास भडगाव येथे माहेरी रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी मेक्सिमा गाडीत बसवुन भगवान सोनवणे हे माघारी फिरले. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास खेडगाव (नंदीचे) जवळ पाचोऱ्याहुन भरधाव वेगाने जाणारी मालवाहू महिंद्रा पिकअप (क्रंमाक – एमएच १९ सीवाय ९२२३) ने मेक्सिमोला जोरधार धडक दिली. या धडकेत प्रवाशांनी भरलेली मेक्सिमो ही रस्त्याच्या खाली जावुन पलटी झाली. या अपघातात गणेश भगवान सोनवणे या ११ महिन्याच्या चिमुकल्याचा वाहनाखाली दबुन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.


तर भैय्या कोळी (चालक) रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा, अनिता पवन चव्हाण (वय – ३८) रा. कोकडी तांडा ता. पाचोरा, सुशिलाबाई धनराज राठोड (वय – ३८) रा. रामदेववाडी ता. जळगांव, विकास सुरेश पवार (वय – २७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, आदित्य विकास पवार (वय – ७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, अनिता भगवान सोनवणे (वय – २२) रा. दापोरा (शिरसोली), लता गोकुळ राठोड (वय – ३७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, ऋषीकेश प्रदिप पंडित (वय – १६) रा. लासगाव ता. पाचोरा व निकीता गोकुळ राठोड (वय – १४) रा. रामदेव वाडी ता. जळगांव हे ९ जण जखमी झाले.


अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, समीर पाटील, संदिप भोई व योगेश पाटील हे तात्काळ हजर होवुन अपघातग्रस्तांना मदत करत त्यांना रुग्णालयात हलवुन वाहतुक सुरळीत केली. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन महिंद्रा पिकअप चालकास पाचोरा पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास पोलिस करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह