⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | दुर्दैवी : औषधांची फवारणी करतांना विषबाधा झाल्याने तरुणाचा मृत्यू

दुर्दैवी : औषधांची फवारणी करतांना विषबाधा झाल्याने तरुणाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । शेतात पिकांवर औषधाची फवारणी करतांना विषबाधा झाल्याने तरूणाचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेने शोककळा पसरली आहे. याबाबत पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अविनाश अशोक भोई (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्यांची वरखेडी शिवारात १ एकर शेत जमिन आहे. अविनाश भोई हे रविवारी ३० जुलै रोजी आपल्या शेतात लावलेल्या पिकावर फवारणी करताना विषारी औषधाने त्यांना भुरळ येवुन ते बेशुद्ध झाले होते. ग्रामस्थांच्या मदतीने अविनाश भोई यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान मृत्यूशी झुंज देत असतानाच सोमवारी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अविनाश हा त्यांच्या कुटुंबियातील कर्ता युवक असल्याने त्याचे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अविनाश भोई यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, तीन बहिणी असा परिवार असुन अविनाश च्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह