---Advertisement---
जळगाव जिल्हा पारोळा

शेतात काम करणाऱ्या सालदाराचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । शेतात काम करणाऱ्या सालदाराचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची र्दुदैवी घटना घडली आहे. तर झाले असे की, काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतात काम करणारा सालदार आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर तिघांसह झाडाखाली उभा राहिला. मात्र, याचदरम्यान वीज कोसळून सालदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला

ेसालदार jpg webp webp

पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण शिवारात रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत सालदारासोबतच्या बाकीच्यांना कुठलीही इजा झाली नाही. सुनील आबाजी ठाकरे (वय २६, रा. दगडी सबगव्हाण ता. पारोळा) असं मयत सालदाराचे नाव आहे.

---Advertisement---

सुनील आबाजी ठाकरे हा भाऊसाहेब गोपीचंद पाटील यांच्याकडे सालदार म्हणून कामास होता. अचानक वादळी वारा तसेच विजांचा कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे सुनील हा काम सोडून शेतातील निंबाच्या झाडाखाली उभा राहिला. याचदरम्यान त्याच्या अंगावर वीज पडली. घटनेची माहिती देण्यासाठी प्रमोद गोपीचंद पाटील यांनी घराकडे धाव घेतली आणि त्यांचे भाऊ शरद गोपीचंद पाटील यांना या घटनेबाबत माहिती दिली.

याला तातडीने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी सुनील यास मयत घोषित केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---