⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दुर्दैवी : चाळीसगावात शेतकर्‍याचा शेतात शॉक लागल्याने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकर्‍याचा विद्युत खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यातील मांदूरणे शिवारात ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. नितीन नाना नामेकर (23) असे मयताचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे शिवारात नितीन नाना नामेकर (23) हा तरुण शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी शुक्रवार, 17 जून रोजी सकाळी शेतात गेला असता शेतातील विजेच्या खांब्यात वीज प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का लागल्याने शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. नितीनच्या शेतातून आबा माळी हे दुध काढण्यासाठी जात असतांना नितीन निपचित पडलेला दिसून आल्यानंतर त्यांनी ही गावातील ग्रामस्थांना कळवल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नितीनला आपला जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला. याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत नितीनच्या पश्चात आई, वडील, बहिण आणि मोठा भाऊ असा परीवार आहे.