दुर्दैवी : लग्नाच्या वर्हाडाचा झाला अपघात, ३२ जणांचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । उत्तराखंडमधील पौड़ी येथे मंगळवारी रात्री लग्नच वर्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात ३२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत, या बसमध्ये ४६ प्रवासी प्रवास करत होते, असे म्हटले जात आहे. प्रशासनाने मदत कार्य सुरु केले आहे.
घटनास्थळी पोलीस आणि एसडीआरएफचे पथकाने बचाव मोहिम सुरू केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आपत्ती नियंत्रण कक्षाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफची बचाव पथके घटनास्थळी बचाव कार्यासाठी पोहोचले आहेत.
https://twitter.com/ANINewsUP/status/1577465240438321152?s=20&t=8kKIpLddfxHJatnnw527Ew
या अपघातात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बसमध्ये ४५ ते ५० जण होते.