⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मुंबई – भुसावळ पॅसेंजर बंद : एकशे पंचवीस खेड्यातील प्रवाशांचे हाल

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेल्या पॅसेंजर मुळे भडगाव तालुक्यातील कजगाव व नगरदेवळा या स्टेशन वरून सुमारे एकशे पंचवीस खेड्यातील प्रवाशांची गैरसोय झाली असुन गेल्या अडीच वर्षांपासून महागडे भाडे खर्च करत प्रवास करावा लागत आहे. या मागणीची खासदार उन्मेष पाटील यांनी दखल घेत बंद असलेली पॅसेंजर तात्काळ सुरू करण्या बाबत ठोस पाठपुरावा करावा अशी मागणी एकशे पंचवीस खेड्यातील प्रवाशी वर्गाने केली आहे.


गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना मुळे मुंबई – भुसावळ,व भुसावळ- देवळाली या दोघ पॅसेंजर बंद करण्यात आल्या. दरम्यान एक भुसावळ – इगतपुरी हि मेमुट्रेन सुरु करत ग्रामीण भागातील प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. मात्र सकाळी मुंबई जाणाऱ्यांची अडचण तर दुसरीकडे सकाळी जिल्ह्यावर जाण्यासाठी गाडीच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण अगोदर सकाळी एक पॅसेंजर देवळाली भुसावळ हि सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरी निम्मित अपडाऊन करणारे कर्मचारी, व्यापारी माल खरेदीसाठी जाणारे व्यापारी,कोर्टकचेरी च्या कामासाठी जळगाव जाणारे या सर्वांच्या दृष्टीने सदर पॅसेंजर हि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सोयीची होती. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून सदर पॅसेंजर बंद केल्याने कजगाव व नगरदेवळा या दोन स्टेशन वरून चढ उतार करणारे अंदाजे एकशे पंचवीस खेड्यातील प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या मुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवासासाठी खर्चिक प्रवास करावा लागत असल्याने मोठं नुकसान होत आहे. तर कजगाव च्या बाजारपेठेवर,प्रवाशी वाहतूक करत रोजीरोटी कमावणारे सह अनेक उद्योग धंद्यावर मंदीची लाटच आली आहे . भडगाव तालुक्यातील कजगाव व नगरदेवळा या दोन स्टेशनवरून अंदाजे शंभर ते सव्वाशे खेड्यावरील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून याची दखल घेत पॅसेंजर तात्काळ सुरू करावी. अशी मागणी सव्वाशे खेड्यातील प्रवाशी वर्गाने केली आहे.


अडीच वर्षांपूर्वी कोरोना मुळे पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोना आटोक्यात आल्या नंतर बरेच एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहेत. मात्र ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण असलेली पॅसेंजर मात्र अद्यापही रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठया प्रमाणावर हाल होत आहेत. कारण ग्रामीण भागातील अनेक युवक मुंबई, नाशिक,पुणे आदि ठीकाणी नोकरी निम्मित स्थायिक झाले आहेत. या ठीकाणी ग्रामीण भागातील नागरिकांना जाण्या येण्यासाठी पॅसेंजर हे एकमेव परवडणारे साधन आहे. मात्र गेल्या अडीच वर्षापासून मुंबई-भुसावळ, भुसावळ-देवळाली या पॅसेंजर बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना महागडे भाडे खर्च करत प्रवास करावा लागत आहे. यात वेळ व पैसा देखील वाया जात आहे. हि सर्कस ग्रामीण भागातील नागरिकांना गेल्या अडीच वर्षांपासून करावी लागत आहे. वास्तविक कोरोना कधीच आटोक्यात आला आहे. त्या नंतर एक्स्प्रेस सुरू करण्यात आले. मात्र मोठया प्रतीक्षे नंतर देखील अद्यापही मुंबई मार्गावरील पॅसेंजर सुरू करण्यात आल्या नसल्या मुळे ग्रामीण भागात रेल्वे प्रशासना विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


सुरत पॅसेंजर सुरू झाली मात्र मुंबई मार्गावरील मुंबई-भुसावळ, भुसावळ-देवळाली पॅसेंजर सुरू करण्या बाबतचे अद्यापही आदेश नसल्याने मुंबई भुसावळ या मार्गावरील ग्रामीण भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. असुन रेल्वे प्रशासनाने मुंबई मार्गावरील दोघ पॅसेंजर सुरू करण्या बाबतचे आदेश द्यावेत अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.