एकनाथ शिंदेच होणार शिवसेनेचे नवे ‘पक्ष प्रमुख’?

जळगाव लाईव्ह न्यूज | २० फेब्रुवारी २०२३ | नुकतेच शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह असलेले धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने राष्ट्रीय कार्यकारणी घोषित करण्यात येणार आहे. यावरून आता एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख होणार कि मुख्य नेता? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अधिक माहीती अशी कि, निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आता शिंदे गटाकडून नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.निवडणुक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेतील अंतर्गत निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून नव्या राष्ट्रीय कार्यकरणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी उद्याच पक्षातील आमदारांची बैठक देखील बोलावली आहे.

एकनाथ शिंदे यांना नव्या कार्यकरणीसाठी पक्षाची निवडणुक घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत पक्ष प्रमुख पदी एकनाथ शिंदे विराजमान होतात की, पक्ष नेता या नव्या पदाची निर्मिती करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.