⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

एरंडोल येथील उमेश महाजन धावले चाळीसगावकरांच्या मदतीला

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । एरंडोल येथील ‘जय बाबाजी फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष व महात्मा जोतिबा फुले युवा मंचचे युवा प्रदेश अध्यक्ष उमेश अभिमन महाजन हे सातत्याने गरजु रुग्णांना त्यांनी स्थापन केलेल्या जय बाबाजी फाऊंडेशनतर्फे मदत करीत असतात. त्यांच्या या स्तृत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चाळीसगाव येथील दिपक येवले यांच्या अडीच वर्षाच्या मुलाला किडणीचा प्रॉब्लेम उद्भवला. त्यावरील ऑपरेशन व उपचारासाठी तेथील डॉक्टरांनी त्यांना साधारण २ लाख रुपये खर्च सांगितला होता. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या व कोरोनामुळे असलेल्या टाळेबंदीमुळे या कुटुंबासमोर मोठे संकट निर्माण झाले होते. अश्या वेळी येवले यांना नाशिक येथील जय बाबाजी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व महात्मा जोतिबा फुले युवा मंचचे युवा प्रदेशाध्यक्ष उमेश अभिमन महाजन यांचा परिचय मिळाला. तेव्हा त्यांच्याशी संपर्क केल्यावर उमेश महाजन देवदूतासारखे हजर राहून त्यांनी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून व आपल्या फाऊंडेशनच्या मदतीने येवले यांच्या मुलाचे ऑपरेशन मोफत घडवून आणले. त्या वेळी दुःखात असलेल्या येवले कुटुंबियात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व त्यांनी युवा प्रदेश अध्यक्ष उमेश महाजन व जय बाबाजी फाऊंडेशन चे आभार मानले.