जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । गोदावरी अभियांत्रिकीच्या उल्हास २ के २५ वार्षिक स्नेहसंमेलाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शारदापूजनाने करण्यात आले. यावेळी प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन),प्रा. अमित म्हसकर (स्नेहसंमेलन समन्वयक) सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते. दि २९ रोजी समारोप केला जाणार आहे.

आज सांस्कृतिक व समूह दिन साजरा करण्यात आला, पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध समृह तयार करत धमाल मस्ती केली. विजेते प्रथम फॅब फाईव गृप द्वितीय टीम इंडिया तृतीय द क्रेझी क्रू समन्वयक प्रा. रुचिता बारी, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत शिंदे प्रा. भावना झांबरे यांनी काम पाहिले.सुत्रसंचालन देवयानी पाटील, पूर्वा चौधरी, रेणुका सपकाळे, करिष्मा नारखेडे, कनिष्का सुरवाडे व सार्थकी चौधरी या विद्यार्थिनींनी केले. तर दुस—या सत्रात सांस्कृतिक दिनानिमीत्त भारतीय संस्कृतिचे सादरीकरण करण्यात आले. विजेते प्रथम संजना नेमाडे व गृप द्वतीय पंकज साळी व गृप तृतीय काजल पाटील गृप.समन्वयक प्रा. रुचिता पाटील,पर्यवेक्षक डॉ. सरोज भोळे प्रा. चेतन विसपुते तर सूत्रसंचालन तरन्नुम पिंजारी, हर्षा धांडे, चैताली मरमट, रोशनी राजपूत, मेघा सोनवणे, मोहीश नारखेडे व यतीश भारंबे या विद्यार्थ्यांनी केले.
गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. अनिकेत पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व विद्यार्थी वर्ग यांचे कौतुक केले. दि २९ रोजी समारोप करण्यात येणार आहे.