रेल्वे

आजपासून उधना-छपरा विशेष एक्स्प्रेस धावणार, खान्देशातील या ५ स्थानकांवर थांबा

जळगाव लाईव्ह न्यूज । सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना ते छपरा दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीमुळे गुजरात, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या गाडीला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ या स्थानकांवर थांबे असून मात्र जळगावला थांबा देण्याला आला नाहीय.

पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०९११५ उधना–छपरा विशेष रेल्वे सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी उधना स्थानकावरून सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होईल. प्रवासादरम्यान विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे घेत ही गाडी बुधवारी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी छपरा स्थानकावर पोहोचणार आहे.

ही गाडी उधना येथून सुटल्यानंतर व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी मार्गे पुढे धावणार आहे. या गाडीला जळगावला मात्र थांबा नाही.

प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष रेल्वेगाडीमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लासचे डबे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष भाडे आकारणीच्या नियमानुसार ही गाडी धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षित करताना विशेष गाडीचे भाडे आणि उपलब्ध आसनांची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button