---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

..तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते : उद्धव ठाकरे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेत मेट्रो कारशेड स्थलांतरित करण्याच्या शिंदे मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध केला आहे. महाराष्ट्र सरकारने मेट्रो कारशेड आरे कॉलनीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. आरेत कारशेड उभारु नका असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते असेही ठाकरे म्हणाले.

udhav thackreay jpg webp

शिवसेना भवनात मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी जमलेले होते. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाआधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात केली.

---Advertisement---

आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला. अमित शाह यांनी मातोश्रीवर माझ्यासोबत जो करार केला होता, त्यानुसार जर झालं असतं तर महाविकास आघाडी सरकारच जन्माला आलं नसतं. सगळं सन्मानानं झाले असते. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, तर मुख्यमंत्र्यांची सही, मग माझी पक्षप्रमुख म्हणून सही, मग आमच्या कराराप्रमाणे हे पत्र फ्रेम करु मंत्रालयात लावायचं, म्हणजे सगळ्यांना कळलं असतं, ही नेमकं ठरलं काय असतं. हे असं सरकार करुन तुम्हाला काय मिळणार आहात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---