⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | बातम्या | उद्धवसेनेचे आंदोलन हे बेगडी आणि दिशाभूल करणारे – डॅा राधेश्याम चौधरी

उद्धवसेनेचे आंदोलन हे बेगडी आणि दिशाभूल करणारे – डॅा राधेश्याम चौधरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२२ । नुकतीच झालेली मनपाची महासभा भाजपाने नाही तर मा महापौर यांनी प्रभु श्रीरामांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या उपमहापौरांची पाठराखण करण्यासाठी तहकूब केली. यानंतर आज मनपातील सत्तेतील उद्धवसेना गटाने आंदोलन करीत त्याचा संबंध हिदूस्थानचे आराध्यदैवत छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामांसोबत जोडत भाजपावर निखालस खोटे, तथ्यहिन, निराधार व कुटील आरोप करीत आपल पाप लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांच आंदोलन म्हणजे एक दिशाभूल करणारा कुटील कांगावा होता. असे भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा सरचिटणीस डॅा राधेश्याम चौधरी म्हणाले.

यावेळीडॅा राधेश्याम चौधरी म्हणाले कि, खर तर पिंप्राळ्यात छत्रपति शिवरायांच स्मारक व्हाव यासाठी भाजपाच्या सदस्यांचे योगदान हे मनपाच्या महासभा इतिवृत्तात नोंदवलेल आहे. वंदनीय शिवराय हे आमच्याच नाही तर महाराष्ट्राच्या कणाकणात, देशवासियांच्या मनामनात वसलेल श्रद्धास्थान आहे. २०२२ च्या मार्च महिन्यात शिवरायांच्या स्मारकाच्या निर्मितीच्या ह्या विषयाला मनपा महासभेत तत्त्वता एकमताने मंजूरी मिळाली होती . तदंनतर दि ७/१०/२२ च्या महासभेत मनपात नविन स्मारक निर्मितीसाठी हेड नसल्याची तांत्रिक अडचण भाजपाचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनीच लक्षात आणून देत यासाठी नविन हेड निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडून या विषयाला मंजूरी देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. अन्यथा महाराजांच्या या स्मारकनिर्मितीच्या विषयाला तांत्रिक अडचण निर्माण झाली असती. ही वस्तुस्थिती मनपाच्या कागदोपत्री नोंदवेलली असतांना स्वःताच पाप लपवत आपल्या नाकर्तेपणाच खापर भाजपावर फोडण्याचा करंटेपणा मनपातील हे सत्ताधारी करत आहेत.


याचबरोबर महाराजांच्या नावाचा वापर करित आपले अपयश लपवण्यासाठी त्यांनी गाठलेल्या या हिन पातळीच्या कारस्थानाची महानगर भाजपातर्फे आम्ही निंदा व धिक्कार करतो. महाराजांच्या या स्मारकासंबंधी आर्कीटेक्टची नेमणूक व शिल्पकाराची निविदा स्विकारणे हे विषय चर्चेला येण्याआधीच रावणभक्त उपमहापौरांची पाठराखण करण्यासाठी महापौर महोदयांनी ही महासभा तहकूब केली. महासभा तहकूब करणार्यांनीच विरोधकांना दोष देत त्यांच्यावर आरोप करणे हास्यास्पदच नाही तर संतापजनक आहे.


जनमताच अपहरण करून सत्तेत आलेली ही मंडळी मनपात अल्पमतात आहे. तरीही त्यांनी सहमतीने विकासाच राजकारण कराव, अशा पद्धतीच आपल अपयश, नाकर्तेपणा लपवण्यासाठी प्रभु श्रीराम व छत्रपती शिवराय या आमच्या श्रद्धास्थानांचा, आराध्य दैवतांचा अवांछित वापर करून दिशाभूल करणारे कांगावे करू नये अशी अपेक्षा बाळगतो. शेवटी जनता हुशार आहे. ये पब्लिक है, सब जानती है, कौन सच्चा कौन झुठा यह पहचानती है! असेही डॅा राधेश्याम चौधरी म्हणाले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह