⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

ITI पास उमेदवारांसाठी ‘या’ सरकारी कंपनीत बंपर भरती, आताच अर्ज करा..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । दहावी, आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये अप्रेंटिस या पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (UCIL Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण 239 पदे भरायची आहेत. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा आहे ते संबंधित साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. UCIL Bharti 2021

रिक्त जागा तपशील
युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये अप्रेंटिसच्या एकूण 239 पदांची भरती केली जाणार आहे. या एकूण पदांपैकी फिटरची 80 पदे, इलेक्ट्रिशियनची 80 पदे आणि वेल्डरची (गॅस व इलेक्ट्रिक) 40 पदे भरायची आहेत. याशिवाय टर्नर/मशिनिस्टच्या 12, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकच्या 5, मेकॅनिक डिझेल/मेकॅनिकल एमव्हीच्या 12, कारपेंटर आणि प्लंबरच्या 5-5 पदांची भरती केली जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी किमान ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (SC आणि ST साठी 45%). याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये किमान ६०% गुणांसह आय.टी.आय.

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : शुल्क नाही

अधिकृत संकेतस्थळ : www.uraniumcorp.in
भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा