जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या असून यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अशातच दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केले आहे. याबाबतची माहिती आज शनिवारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
जळगाव शहरासह इतर बाजारपेठ परिसरातून बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस जात आहे. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळीसह पथकाने १४ जुलै रोजी मध्यरात्री एसएम आयटी कॉलेज परिसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या दोघांकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहे. दरम्यान यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी आज शनिवार दिली आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.