⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । येथील कानळदा नाका परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरील दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

अधिक असे अशी की, शहरातील शिवाजी नगरातील कानळदा नाका येथे हुसैनशाह शब्बीर शहा (वय-२२) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण दुचाकीने जात असतांना समोरून येणाऱ्या भरधाव कार क्रमांक (एमएच १९ बीजे ८३०६) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार हुसैन शाह यांच्या दोन्ही पाय आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, कार चालकाने मदत न करत थेट दुचाकी स्वाराला दमदाटी करून कार घेवून पसार झाला. याप्रकरणी हुसैन शाह यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल बडगुजर हे करीत आहेत.