⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या २८ जून, ५ जुलैला रद्द, चौघांच्या मार्गात बदल

भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या २८ जून, ५ जुलैला रद्द, चौघांच्या मार्गात बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद बल्लारशाह विभागातील आसिफाबाद रोड आणि रेहचानी रोड स्थानकांदरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनीच्या कामासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या दोन गाड्या रद्द, तर चार गाड्यांचे मार्ग बदल केले आहेत.

पुणे काजीपेठ एक्सप्रेस हीगाडी २८ जून व ५ जुलै, काजीपेठ पुणे एक्सप्रेस ३० जून व ७ जुलैला रद्द असेल, चार गाडधांच्या मार्गात बदल केले आहेत. त्यात ओखा-पुरी एक्सप्रेस २६ जून व ३ जुलैला वर्धा – नागपूर रायपूर तिटीलागढ़ विजियानगरम खुर्दा रोड मार्गे वळवली जाईल. ही गाडी चंद्रपूर बल्हारशाह मंचिरवाल – रामागुंडम वारंगल विजयवाडा एलुरु राजमुंद्री अनाकपल्ले – समलकोट विशाखापट्टणम स्थानकांवरून जाणार नाही.

पुरी – ओखा एक्स्प्रेस २१ व ३० जून या दिवशी मार्ग बदलून धावेल. विशाखापट्टणम गांधीधाम एक्सप्रेस २७ जून व ४ जुलैला विशाखापट्टणम विजियानगरम – रायगड – तिटीलागड – रावपूर नागपूर वर्षा मार्गे वळवली आहे. ही गाडी समलकोट राजमुंद्री एलुरु विजयवाडा – वारंगल रामागुंडम मंचिरयाल सिरपुर कागजनगर – बल्हारशाह-चंद्रपूर स्टेशनवर जाणार नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.