Sawada News-जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । सावदा येथील तडवी वाड्यात पायरीवर बसण्याचे कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. यात दोन्ही गटाकडून लोखंडी रॉड, लाकडी बँट यासह लाठ्याकाढ्याचा सर्रास वापर झाला. दोन्ही गटातील सुमारे 8 ते 10 जण जखमी झाले असून पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या आहे. या प्रकरणी दोन्ही कडील 37 जणांना विरुद्ध गुन्हा दाखल होऊन 18 जणांना अद्यावपर्यंत अटक करण्यात आली आहे.
सावदा येथे दि 28 रोजी संध्याकाळी 05.30 वा.चे सुमारास सावदा शहरातील काजीपुरा भागातील सार्वजनिक संडाशीजवळील नाल्यावर तडवी वाड्यातील दोन गटातील इसमानी एकमेकांविरुध्द झालेल्या भांडण्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवुन शिवीगाळ करुन यातील आरोपी यानी त्याचे हातातील लोखंडी रॉड, मोठी लाकडी चॅट, लाठ्याकाठ्या, दगड विटानी एकमेकांना मारून जीवे ठार मारण्याच्या इराद्याने दुखापत केलीली असुन सदर प्रकरणी अमीर रमजान तडवी वय-19 धंदा- शिक्षण रा. काजीपुरा खालचा तडवी वाडा, सावदा याचे फिर्यादीवरुन १) सुलतान कादर तडवी २) अमीन कादर तडवी (३) शाहरुख रशिद तडवी ४) राजु अनवर तडवी, ५) नबाव उस्मान तडवी 6) समीर सलीम तडवी, 7) रहेमान परवत तडवी, 8) जमीर हमीद तडवी, 9) शेखर गफ्फार तडवी, 10) अरबाज राजु तडवी 11) मोईन आमद तडवी,12) आसिफ अहमद तडवी 13) जुबेर अल्लाउद्दीन तडवी 14) अनिस हबीब तडवी, 15) आमद चोंदखा तडवीं, 16) सखुबाई शरीफ तडवी 17) रशिदा आमद तडवी 18) गुलशान रहेमान तडवी 19) हसीना खलील तडवी, 20) दगुबाई सलीम तडवी, सर्व रा. वरचा तडवी वाडा काजीपुरा सर्व रा. काझीपुरा, तडवीवाडा, सावदा ता. रावेर व इतर 5 ते 6 इसम नाव माहीत नाही अंशाविरुध्द सावदा पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरनं 191/2022 भा.द.वि क 307, 324,323,337,504, 143,147, 149 तसेच 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे दाखल करण्यात आला.
याच कारणा वरून दुसऱ्या गटातील नवाब उस्मान तडवी, वय- 39, धंदा प्लंबर, रा. काझीपुरा, वरचा तडवी वाडा, सावदा ता. रावेर फिर्यादीवरुन 1) मुराद शेरखा तडवी, 2) जावेद शेरखां तडवी (3) नवाज कासम तडवी, 4) सलीम चांदखा तडवी, 5) रमजान चांदखों तडवी, 6) नवाज रमजान तडवी, 7) अमीन रमजान तडवी, 8) सलमान जुम्मा तडवी, 9) आदिल शब्बीर तडवी, 10) अक्रम करीम तडवी, 11) खातूनबाई चाँदखाँ तडवी, 12) अशीनबाई दगडु तडवी, 13) दगडु नमाज तडवी, 14) सुपडाबाई अय्युब तडवी, 15) शबानाबाई मुराद तडवीं, 16) बैतुल करीम तडवी, 17) सायराबाई सायबु तडवी, व इतर 10 ते 12 लोक सर्व रा. काझीपुरा, तडवीवाडा, सावदा ता. रावेर याचे विरुध्द सीसीटीएनएस गुरनं 191/2022 भा.द.वि क 307, 324,323,337,504, 143,147, 149 तसेच 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यात 18 आरोपीताना अटक करण्यात आली असुन पुढील तपास मा. कुणाल सोनवणे उप विभागीय पोलीस अधिकारी याचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री देविदास इंगोले व पोउपनि श्री समाधान गायकवाड हे.कॉ. उमेश पाटील व सहकारी करीत आहेत,