Jalgaon : घरफोडीकरून संसारोपयोगी वस्तू चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या ; 52 हजाराचा मुद्देमाल जप्त

नोव्हेंबर 19, 2025 2:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे चोरट्यांना खाकीचा धाकच राहिला नसल्याचं दिसत असून अशात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागात झालेल्या घरफोडीतील दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. या कारवाईत पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे.

ggc

काय आहे घटना?

याबाबत असे की, जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या राजेंद्र दुसाने यांच्या बंद असलेल्या घरात घरफोडी करून संसारोपयोगी वस्तू चोरीस गेल्या होत्या. एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस शेगडी, तांबे-पितळी भांडीसह इतर साहित्याचा समावेश होता. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्यासह अनुभवी अंमलदारांचे एक पथक नेमले. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने लक्ष्मी नगर भागात सापळा रचून संदीप तुळशीराम शेवरे ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने आपला साथीदार राहुल सुपडू चौधरी आणि एका अल्पवयीन मुलासह मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच संशयित आरोपी राहुल चौधरी यालाही ताब्यात घेऊन गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now