जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । इलेक्ट्रिक टू-व्हीलर उद्योग सध्या तेजीत आहे. TVS मोटर कंपनीने TVS X नावाने इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आणली आहे. दुबईमध्ये (Dubai) लॉन्च केलेली, TVS X ₹ 2.50 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली गेली आहे, ज्यामुळे ती देशातील सर्वात महाग इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात या गाड्यांची डिलेव्हरी 15 विविध शहरात केली जाणार आहे. सोबतच या गाड्यांची बुकींग (Booking) देखील सुरू झाली आहे. या स्कूटरच्या स्पोर्टी लुकमुळे तरूणांमध्ये याची क्रेझ जास्त पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
TVS X काय आहे फीचर्स??
TVS X कंपनीच्या ‘Born Electric’ axleton प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यात अॅल्युमिनियम धातुची फ्रेम वापरली जाते, जी नेहमीच्या स्कूटरच्या फ्रेमपेक्षा 2.5 पट अधिक मजबूत असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प (Head Lamp) आणि टेल लॅम्प देण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या स्कूटरमध्ये 3.8 kWh बॅटरी (Battery) आणि 11kW PMSM मोटरने सुसज्ज आहे. जी 105 kmph प्रतितास धावते. तसेच 2.6 सेकंदात 0 ते 40 kmph पर्यंत वेग (Speed) पकडण्यास सक्षम असून 40 Nm पीक टॉर्क जनरेट करते. गाडीत Xtealth, Xtride आणि Xonic असे एकूण तीन राईड मोड (Ride Mode) असतील. X ला सिंगल-चॅनल ABS आणि ‘इंटेलिजेंट’ क्रूझ कंट्रोल देखील मिळतो. कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, गाडीला 10.2-इंच TFT स्क्रीन मिळते जी टिल्ट अॅडजस्टेबल (Tilt Adjustable) देखील आहे. वेलनेस फंक्शन्स, गेम्स (Games), लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग (Live Video Streaming) आणि ब्राउझिंगमध्ये असे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर 3 kW बॅटरीच्या मदतीने गाडी जवळपास 50% चार्ज होऊ शकते तर 950 kW बॅटरी असल्यास तीन तास 40 मिनिटात 80% चार्ज होते.