⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | वाणिज्य | महागाईचा चटका! ऐन सणासुदीच्या तोंडावर तूरडाळ महागली, काय आहे एक किलोचा दर?

महागाईचा चटका! ऐन सणासुदीच्या तोंडावर तूरडाळ महागली, काय आहे एक किलोचा दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । सध्या महागाई सर्वसामान्यांची पाठ काही सोडत नाहीय. मागील काही महिन्यापासून टोमॅटो व इतर भाज्यांच्या दरात सतत वाढ होताना पाहायला मिळाली. आता अशातच ऐन सणासुदीत तूरडाळ महागली असून यामुळे पुन्हा एकदा महागाईचा चटका सोसावा लागणार आहे.

काय आहे दर?
कडधान्यासह डाळीचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ सध्या प्रतिकिलो १६० ते १७० रुपयांवर आली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर व मूग डाळीच्या भावातही मागील दोन महिन्यांत सरासरी २० रुपयांनी वाढ झाली.

अवकाळी पाऊस व कडाक्याच्या उन्हामुळे डाळींच्या उत्पादनाला अधिक फटका बसला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची आवक कमी होत असून दरात वाढ होत आहे. सध्या किरकोळ बाजारात डाळींचे दर ३० ते ३५ टक्के तर कडधान्यांचे दर २० ते २२ टक्क्यांनी कडाडले आहे. जागतिक बाजारातील कडधान्यांच्या वाढत्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील दोन महिन्यात तूरडाळ १०० ते ११० रुपयांवरुन १६० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हरभरा डाळ ५७ ते ५८ रुपयांवरुन ७० रुपये प्रतिकिलोवर गेली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून शेतकरी विक्री करत असलेल्या तुरडाळीला मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सरासरी १०,००० ते १३,००० रुपये (Price) दर मिळाला. येत्या काळात तूरडाळीच्या दरात घट होण्याची शक्यता कमी प्रमाणात वर्तवण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.