⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | 30 पोलीस अधिकाऱ्यांची जळगाव जिल्ह्यातून बदली ; हे 24 नवीन अधिकारी येणार..

30 पोलीस अधिकाऱ्यांची जळगाव जिल्ह्यातून बदली ; हे 24 नवीन अधिकारी येणार..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२४ । लोकसभेनंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने राज्यात पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. याच दरम्यान आता जळगाव जिल्ह्यातून ३० पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली असून नवीन २४ अधिकारी जळगावात बदली होऊन येणार आहेत. याबाबतचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी पारीत केले.

जळगाव जिल्ह्यांतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांची अहमदनगर येथे तर अमळनेर येथून नियंत्रण कक्षात आलेले विजय शिंदे यांची नाशिक ग्रामीण येथे अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातून दोन पोलिस निरीक्षक जाणार असून नंदुरबार येथील राहुलकुमार पवार व नीलेश गायकवाड जळगावात येत आहेत.

या सोबतच विनंती बदल्यांमध्ये जिल्ह्यात तीन नवीन सहाय्यक पोलिस निरीक्षक येणार आहेत. दोन पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्यातून इतरत्र बदली झाली असून पाच नवीन उपनिरीक्षक येणार आहेत. जिल्‍ह्‍यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या १९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांची जिल्ह्यातून बदली झाली असून नवीन सात सहाय्यक पोलिस निरीक्षक येणार आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या सात उपनिरीक्षकांची बदली झाली असून तेवढेच अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत.

बदली झालेले व येणारे सहाय्यक निरीक्षक (कंसात संध्याची नेमणूक) :
गणेश शिवाजी म्हस्के (नाशिक) जळगाव, योगिता मधुकर नारखेडे (नाशिक ग्रा) जळगाव, अमितकुमार प्रतापसिंग बागूल (नंदुरबार)जळगाव, अनिल लोटन वाघ आणि जयेश पिराजी पाटील (नाशिक ) जळगाव, रवींद्र नारायण पिंगळे, प्रमोद वाघ आणि नितीन नारायण रणदिवे, (अहमदनगर) जळगाव, संदीप अशोक हजारे (जळगाव) अहमदनगर, शीतलकुमार नाईक जळगावी मुदतवाढ, रवींद्र पांडुरंग बागूल(जळगाव) नंदुरबार, रूपाली संभाजी चव्हाण (जळगाव) नाशिक ग्रामीण, अनिल छबू मोरे व मीना तडवी आणि नीलेश गायकवाड(जळगाव) मुदतवाढ, उमेश बोरसे, दीपक बिरारी, अमोल मोरे, राहुल मोरे (जळगाव) नाशिक ग्रामीण, तुषार देवरे (जळगाव) धुळे, किशोर पवार, संदीप परदेशी, गणेश अहिरे, अमोल पवार आणि हरीश भोये (जळगाव) अहमदनगर, विनोदकुमार गोसावी (जळगाव) नंदुरबार, दिनेश भदाने (नंदुरबार) जळगावी बदली करण्यात आली आहे.

उपनिरीक्षक (कंसात सध्याची नेमणूक):
गणेश चौभे (जळगाव) नाशिक ग्रामीण, विनोद मधुकर खांडबहाले(जळगाव) अहमदनगर, अमोल किशन गुंजाळ (जळगाव) नंदुरबार, संदीप श्रीराम चेडे (जळगाव) नाशिक ग्रामीण, विजय रामसिंग वसावे (जळगाव) नंदुरबार, अविनाश लक्ष्मण दहिफळे (जळगाव) धुळे, गणेश मुरलीधर मुर्हे (जळगाव)नंदुरबार, माया नारायणसिंग राजपूत (नंदुरबार) जळगाव, राहुल शिवाजी सानप, मनोज जनार्दन महाजन आणि सोपान रमेश गोरे या तिघांची (अहमदनगर) जळगाव येथे बदली झाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.